हातकणंगले / प्रतिनिधी
शाळा हे विद्येचे माहेरघर आहे जो शिक्षण घेतो तो वाघासारखे डरकाळी फोडतो , शालेय जीवनात जेवढे शिकता येईल तेवढे शिक्षण घ्या , छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर ‘ संत तुकाराम , बना शिवतेज शाळा मुलाना घडविण्यासाठी अत्यंत चांगली आहे येथील संस्था चालक अध्यापक चांगले मुलाच्यावर संस्कार
करतात विद्यार्थी ना शैक्षणिक क्षेत्रात आजीबात कॉपी करून पास होवू नका असे केला तर जीवनात तुम्ही नापास होणार अ से प्रखड मत कथा कथनकार संपतराव चव्हाण यांनी केले ते ता.हातकणंगले येथील आळते येथे शिवतेज शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्याच्या स्नेह संमेलन व पारितोषक वितरण समारंभ च्या
उदघाटन प्रसंगी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आळते गावचे सुपूत्र व इचलकरंजी येथील प्रसिद्ध उद्योगपती रोटरीयन अजित टारे होते.कार्यक्रमामध्ये शाळेचे अध्यक्ष मुरलीधर दिक्षीत यानी शाळा कशी उभी राहीली याचा इतिहास सांगितला आणि आपण पुढे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार असे सांगितले.
कार्यक्रमात शेतकरी दूध संस्थेचे अध्यक्ष बाळगोंडा पाटील यांनी आपल्या मनोगतात यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले शाळ उत्तमरित्या चालवल्या बददल संस्था चालक व अध्यापक याचे ही कौतुक करून शाळेला आपणा जमेल तेवढे सहकार्य करू असे सांगीतले
कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित टार यानी आपल्या मनोगतात मुलाचे कौतुक करून शाळा उत्तमरित्या चालू आहे आता पर्यंत आपण स्वत रोटरीच्या माध्यमातून शाळेस भरपूर मदत केली आहे कारण माझ्या गावातील मुले शिकली पाहिजेत म्हणून आताच संस्थेचे अध्यक्ष दिक्षीत यानी सांगीतले.
आम्ही स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करणार आहोत याही विषयी आम्हाला शक्य होईल तेवढे मदत करू असे सांगीतले.कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन ने करण्यात आली प्रास्तविक आध्यापिका हातगिणे यानी केले कार्यक्रमात सर्व मान्यवराच व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आल.
कार्यक्रमास शिवतेज पंतसंस्थेच अध्यक्ष डॉ सुरज बुरसे ‘पत्रकार संघाचे अध्यक्ष सुकमार अब्दागिरे पत्रकार विनयकुमार पाटील ‘ संस्थेचे संचालक अशिष भवाण लाला पोवार यांच्यासह शाळेचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक संगीता जोशी त्याचे सर्व अध्यापक वर्ग गावातील अनेक मान्यवर व पालक वर्ग उपस्थित होते.