भारतीय युवा मोर्चाचे एक लाख सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट – डॉ अरविंद माने

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

 

महाराष्ट्र राज्यात सर्वत्र भारतीय जनता युवा मोर्चाचे दिनांक १ जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत सभासद नोंदणी अभियान सुरू आहे.या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व विभागातून एक लाख सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे.या सभासद नोंदणी अभियानाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व शिरोळचे माजी नगरसेवक डॉ.अरविंद माने यांनी दिली आहे.डॉ.अरविंद  माने यावेळी बोलताना म्हणाले की,राज्यातील व देशातील युवक व युवती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी आहेत.भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित सभासद नोंदणी अभियानास युवती व युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.हजारो युवक आणि युवती भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सक्रिय होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. राजकारणात आणि समाजकारणात युवकांनी पुढे यावे यासाठी राज्यभर भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आहे.राज्यातील तरुण यामध्ये सभासद नोंदणी करून भारतीय जनता युवा मोर्चा सहभागी होत आहेत.भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व अंतर्गत येणाऱ्या शाहूवाडी,पन्हाळा,हातकणंगले इचलकरंजी, शिरोळ या तालुक्यातील असंख्य तरुण व तरुणी भारतीय जनता युवा मोर्चाचे काम करण्यास इच्छुक आहेत. यामुळे ग्रामीण पूर्व विभागातून भारतीय जनता युवा मोर्चाच्या सभासद नोंदणी अभियानातून एक लाख सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे.या अभियानाला युवती व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वासही डॉ अरविंद माने यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!