पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पटेल मल्टीपर्पज हॉल येथे पार पडला. भाऊ,बहिण,देशभक्ती पारंपारिक लोकगीते,कोळीगीत, ऐतिहासिक गीते,या विषयावर’ कार्यक्रम सादर झाला तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर विलासनगर हि प्रशाला २५ वर्ष ज्ञानदानाचे कार्य करीत असून या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर आहेत.
“वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो.या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळते.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो.
नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही,तर व्यावसायिक,शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांचा चांगला उपयोग होतो.सध्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून शिरोली गावाचे नाव उज्ज्वल करावे आजचे युग संगणकीय युग
आहे.पालकांनी आपल्या पाल्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद यांच्यासारखे बुद्धिवान व कर्तुत्वान होण्याचे ध्येय ठेवावे असे संस्थेचे संस्थापक एस. एन.पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.प्राथमिक व माध्यमिक विद्यालय विलास नगरच्या वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे विद्यार्थी,शिक्षक,पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.बालवाडी ते दहावी या वर्गातील
विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनाची सुरुवात राष्ट्रगीत व गणेश वंदना यांनी झाली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक सदाशिव पाटील व सचिव सौ.माधवी पाटील हे होते.या कार्यक्रमास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड,
शिरोली ग्रामपंचायत माजी उपसरपंच,सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे,उपसरपंच बाजीराव पाटील,ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव ,सदस्य महंमद महात,सदस्य श्रीकांत कांबळे, सदस्य प्रतिनिधी व उद्योजक बाळासो पाटील ,उद्योजक महंमद येळापुरे,प्राथमिक व माध्यमिक विद्यालय दऱ्याचे वडगावचे मुख्याध्यापक केदारी मगदूम कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत संस्थापक एस.एन.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शाळेचे कर्तव्यदक्ष शिष्यवृत्ती मध्ये तज्ञ मनमिळाऊ ज्येष्ठ शिक्षक तुकाराम हराळे यांना कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्था यांच्या तर्फे विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड,माजी उपसरपंच कृष्णात करपे,उपसरपंच बाजीराव पाटील, एस.एन.पाटील,महंमद महात सदस्य विजय जाधव सदस्य श्रीकांत कांबळे ग्रामपंचायत सदस्य,शाळेचे संस्थापक सचिव संचालक व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले
या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा शालेय विद्यार्थ्यांनी सांभाळली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयचे लहू कांबळे,प्रदीप गुरव,शशिकांत पाटील तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी यांनी केले.सदर कार्यक्रमाचे आभार शाळेचे शिक्षक कुंडलिक जाधव यांनी मानले.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन
संस्थेच्या संचालिका व शिक्षिका सौ.प्रतिभा पाटील सौ.सविता पाटील,सौ भाग्यश्री डोईफोडे यांनी केले.सदर कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा संस्थेचे अध्यक्ष एस.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले.वंदे मातरम या देशभक्ती गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.