हेरवाड मार्गावरील अपघाताची मालिका थांबेना युवक गंभीर जखमी

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

सलगर-हेरवाड मार्गावर अपघाताची मालिका थांबायचे नाव घेत नाही. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हेरवाड हद्दीतील दर्ग्याजवळ चारचाकी गाडी आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार जखमी झाला आहे.शिवतेज पुजारी(रा.हेरवाड,ता.शिरोळ)असे जखमीचे नाव आहे.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सलगर-हेरवाड मार्गावर चारचाकी गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात मोटरसायकलस्वाराच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

 

गेल्या काही महिन्यांपासून हेरवाड-कुरुंदवाड मार्गावर अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. संबंधित रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्यांचे काम पूर्ण झाले असले तरीही अपघात थांबत नाहीत. वाहनांच्या भरधाव वेगामुळे अपघातांची संख्या वाढत आहे.

 

 

संबंधित मार्गावर अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीवर नियंत्रण आणणे, वेग मर्यादा ठरवणे आणि रस्त्यावरील अडथळे दूर करणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांनी यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने राबवण्याची गरज आहे.

error: Content is protected !!