शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ दत्त साखर कारखान्याचे माजी संचालक स्वर्गीय युसूफसाहेब रसुलसाहेब मेस्त्री यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त श्री.दत्त आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय युसूफसाहेब यांच्या कार्याची आठवण म्हणून रुग्णालयातील रुग्णांना फळे वितरित करण्यात आली.मेस्त्री परिवाराच्या सामाजिक उपक्रमाबद्दल डॉ कुमार पाटील यांनी स्वर्गीय
युसूफसाहेब मेस्त्री यांच्या आठवणींना उजाळा दिला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय युसूफसाहेब मेस्त्री यांच्या परिवाराचे श्री.दत्त आरोग्य केंद्र यांच्यावतीने आभार व्यक्त केले. स्वर्गीय युसूफसाहेब यांच्या कार्याचे स्मरण ठेवण्यासाठी आजचा उपक्रम प्रेरणादायी ठरले असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.मा.शेख सर, डॉ.कुमार पाटील,हैदरअली मेस्त्री,अब्दुल खलिफ,कैफ आलासे, उबेद मेस्त्री,रियाज शेख,मुज्जमिल आलासे,साहिल खलिफ,अरमान खलिफ,साहिल मत्ते,यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.