डिग्रीपेक्षा समाजात कसे वागावे ? याचे शिक्षण साहित्य संमेलनात मिळते – आप्पासाहेब कोळी 

Spread the love

संवाद ग्रामीण साहित्य संमेलन २०२४चा पुरस्कार

दत्तवाड / प्रतिनिधी

डिग्री पेक्षा समाजात कसे वागावे?याचे शिक्षण साहित्य संमेलनामध्येच मिळते म्हणूनच साहित्य संमेलनास उपस्थिती लावणे ही काळाची गरज आहे.असे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी आवाहन केले.ते साहित्य बहुउद्देशीय संस्था शिरढोण आयोजित ११ व्या संवाद ग्रामीण साहित्य संमेलनात पुरस्कार स्वीकारताना बोलत होते.

 

 

ते पुढे बोलताना म्हणाले की कोल्हापूर,मुंबई,सिंधुदुर्ग,ठाणे व सांगली या ठिकाणी ३८ वर्षे सेवा करताना अतिसंवेदनशील पोलिस स्टेशन क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखत कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. गुन्हेगारांचे समुपदेशन व प्रबोधन करून सुमार्गावर जगण्यासाठी प्रयत्न केले.सह्वदयी,समाजाप्रती असणारे ऋण फेडण्यासाठी अनेकांना मदत केली.

 

 

 

रोटरीच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने सामाजिक कार्ये करीत आहेत. सेवानिवृत्ती समयी एका पोलिस अधिकाऱ्यासाठी आसवे गाळणारी जनता क्वचितच पाहावयास मिळते. अशा लोकप्रिय सेवानिवृत पोलिस निरीक्षक श्री.आप्पासाहेब कोळी यांना संमेलनाध्यक्ष प्रा.सुभाष कवडे यांच्या शुभहस्ते कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!