दत्तवाड / प्रतिनिधी
विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड ता.शिरोळ शाळेचा विद्यार्थी कु.पृथ्वीराज पुंडलिक चव्हाण इयत्ता ४थी याने नवे दानवाड येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत ३० किलोग्रॅम वजनी गटात उपविजेता ठरला.शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था कुरुंदवाड चे माजी चेअरमन श्री.अशोक कोळी यांच्या शुभहस्ते पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.चि.पृथ्वीराज चव्हाण याला गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी, बीट विस्तार अधिकारी अनिल ओमासे, केंद्र प्रमुख संजय निकम,केंद्र समन्वयक सुभाष कुरूंदवाडे, मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे,निलेश माने यांचे मार्गदर्शन लाभले.तर आई सौ.अंजली,वडील पुंडलिक चव्हाण यांचेसह शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोत्साहन लाभले.