पुलावर भरधाव चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

नृसिंहवाडी (ता.शिरोळ)दरम्यानच्या यादव पुलाजवळ भरधाव चार चाकी गाडीने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली, तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे.या अपघाताने वाहतुक विस्कळीत झाली होती.याबाबत पोलिसात रात्री उशिरा कोणतीच नोंद झालेली नाही.दरम्यान हा अपघात शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. जखमींच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नृसिंहवाडीहून कुरुंदवाडकडे भरधाव वेगाने गाडी येत होती. पुलाच्या कुरुंदवाड हद्दीत गाडीचे नियंत्रण सुटले आणि ती अचानक विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या दोन दुचाकींवर आदळली.पहिल्या दुचाकीवर असलेल्या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने कुरुंदवाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.दुसऱ्या दुचाकीस्वाराला डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी अपघातानंतर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.कुरुंदवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भरधाव वेगामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, चालकाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे वाहनचालकांनी वेग मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

error: Content is protected !!