दत्तवाड / प्रतिनिधी
दत्तनगर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये लहान गट खो खो ( मुली ) द्वितीय क्रमांक,लांब उडी मध्ये कु.सिद्धी सागर चावरे हिने तृतीय क्रमांक पटकावला.५०मी धावणे मध्ये कु.आराध्या सूरज कोळी हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच सांस्कृतिक स्पर्धेत लहान गट समूहगीत प्रथम क्रमांक,समूहनृत्य प्रथम क्रमांक,नाट्यीकरण द्वितीय क्रमांक व कथाकथन मध्ये कु.स्वरा शशिकांत राजमाने हिने द्वितीय क्रमांक मिळवला या उज्ज्वल यशाबद्दल मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.सर्व यशस्वी विद्यार्थिनींना गट शिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत,केंद्रप्रमुख आण्णा मुंडे, मुख्याध्यापक हरिदास घोळवे,वर्गशिक्षक सतिश नलवडे,सौ.राजश्री रावळ, श्रीम.दीपमाला कोळी, सौ.वहिदा मुल्ला,धनाजी आवळे,दत्तू सरगर, श्रीम.राजश्री टोणे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.