इनोव्हा गाडीच्या धडकेत जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

सलगर-सदलगा महामार्गावर तेरवाड (ता. शिरोळ) येथे भरधाव इनोव्हा गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले.यात उपचारादरम्यान पत्नी शोभा सदाशिव कोरवी (रा.हेरवाड,ता.शिरोळ) यांचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला,तर पती सदाशिव कृष्णा कोरवी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान या अपघातानंतर इनोव्हा गाडी संशयित चालक अनिल शिवाजी पाटील (वय 45,रा.सोलापूर) याच्याविरोधात कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली. संशयित चालक अनिल शिवाजी पाटील (वय 45,रा.सोलापूर) याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवलेल्या इनोव्हा गाडीने (क्रमांक एम.एच.16.ए.टी.6466) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कोरवी दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. सदाशिव व शोभा कोरवी फोनवर बोलत असताना झालेल्या या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र, उपचारादरम्यान शोभा कोरवी यांचा मृत्यू झाला.या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहनचालकांचा वेग अनियंत्रित असल्याने सलगर-सदलगा महामार्गावर झालेल्या अपघातात कोरवी यांचा चौथा बळी ठरला आहे.स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वेगमर्यादा व वाहतूक सुरक्षेवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

error: Content is protected !!