सासऱ्याचा खून करणाऱ्या सिकंदर शेखला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस सुनावली कोठडी

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील तीन बत्ती चौक परिसरात असणाऱ्या आझाद गल्लीमध्ये जावई सिकंदर शेख यांनी सासरा जावेद लाटकर यांच्यात डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या केली होती.आज सिकंदर शेख याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.माझ्या मुलीला मला परत द्या या मागणीसाठी सिकंदर शेख हा गेला होता.यावेळी सासऱ्याने त्याला विरोध केल्यानंतर सिकंदर शेख यांनी सासऱ्याचा जीव घेतला या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील करत आहेत. इचलकरंजी शहरामध्ये कौटुंबिक वादातून खून मारामारीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.शहरातील तीन बत्ती चौक परिसरात असणाऱ्या आजाद गल्लीमध्ये सिकंदर शेख याची सासरवाडी आहे. जावेद लाटकर यांच्या मुलीशी विवाह झाला होता. सिकंदर शेख याला एक लहान मुलगी आहे.गेल्या काही दिवसापासून सिकंदर व त्याच्या पत्नीमध्ये वाद होत होते. हे दोघे विभक्त राहत होते.पण सिकंदर वारंवार माझी मुलगी मला परत द्या अशी मागणी करत होता याची माहिती त्यांनी पोलिसांना हि दिली होती पण पोलिसांनी याकडे मात्र दुर्लक्ष केले होते.सिकंदर शेख यांनी बुधवारी आझाद गल्लीत येते असणाऱ्या जावेद लाटकर यांच्या घरी जाऊन माझी मुलगी मला परत द्या अशी मागणी केली असता जावेद लाटकर यांनी याला विरोध दर्शवला तसेच सिकंदर शेख याला मारहाण केली.याचाच राग मनात धरून सिकंदर शेख यांनी घराबाहेर येऊन तुला आता मी सोडणार नाही अशी भाषा केल्यानंतर जावेद लाटकर यांनी सिकंदरला काठीने मारहाण केली.त्यावेळी असणाऱ्या सिकंदर शेख यांनी दगड घेऊन जावेद लाटकरच्या डोक्यात दगड घातला व जखमी केले तेथून पळत जात असणारा पुन्हा एक मोठा दगड घेऊन जावेद लाटकरच्या डोक्यात घातला.यामध्ये जावेद लाटकर याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत बारा तासाच्या आत सिकंदर शेख याला अटक करून आज त्याला न्यायालयात हजर केल असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील करत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये इचलकरंजी शहरांमध्ये दोन खून व गेल्या आठ दिवसांमध्ये हाणामारी गंभीर जखमी करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.त्यामुळे इचलकरंजी शहरांमध्ये एकच खळबळ माजली आहे. सध्या किरकोळ कारणांमुळे वाद होऊ लागले आहे. त्या त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून ज्या ठिकाणी गांजा सेवन करणारे बेकायदेशीर दारू विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!