पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील एस.एम.ट्रॅक्टर स्पेअर्स कोल्हापुर जिल्हा स्टॉकिस्ट यांना न्यू हॉलंड पार्टस व ऑईल विक्रीत भारतामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . या पुरस्काराचे वितरण ताज अरावली रिसॉर्ट, उदयपुर राजस्थान येथे पार पडले.पुलाची शिरोली ( ता हातकणंगले ) येथील एस. एम. ट्रॅक्टर स्पेअर्स यांना भारतामध्ये हा पुरस्कार २००८ पासुन ऑईल मध्ये सलग नं 1 चा व पार्टस मध्ये २०१० पासुन सलग १५ वर्षे नं १ चा पुरस्कार मिळत आहे. यावेळी ही ताज अरावली रिसॉर्ट, उदयपुर राजस्थान येथे न्यू हॉलंड कंपनीकडून या पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला या पुरस्कारासाठी देशातील १५० वितरकांकडून सहभाग नोंदवला होता पण शिरोली पुलाची येथील एस. एम. ट्रॅक्टर स्पेअर्स चे मालक श्री सलिम महात यांचा ग्राहक,मेकॅनिक व रिटेलर यांच्याशी असलेली आपुलकी, जिव्हाळा, प्रामाणिकपणे 365 दिवस दिलेली सेवा व कामगार कर्मचारी सहकार्याने हा पुरस्कार एस. एम. ट्रॅक्टर स्पेअर्स याना मिळाला आहे.हा पुरस्कार न्यू हॉलंड कंपणीचे AMS डायरेक्टर राजेंद्र चौधरी, सेल्स मार्केटिंग हेड प्रशांत चव्हाण, लॉजिस्टीक गौरवजी, सेटरिंग अरुण पराशर, महाराष्ट्र एरिया मॅनेजर प्रविण देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एस. एम. ट्रॅक्टर स्पेअर्सचे मालक श्री सलिम महात याना देण्यात आला यावेळी भारतातील कंपणीचे सर्व अधिकारी व सर्व स्टॉकिस्ट या प्रसंगी उपस्थित होते.