कराटे स्पर्धेत घालवाडच्या कु.मानसी मोरे हिचे सुयश

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

कन्या विद्या मंदिर घालवाड ता.शिरोळ ची विद्यार्थिनी
कु.मानसी महादेव मोरे इयत्ता सहावी हिने १४ वर्षाखालील व २४ किलोग्रॅम वजनी गट शालेय कराटे स्पर्धेत तालुका, जिल्हा,राज्य येथे गोल्ड मेडल मिळवून नॅशनल स्तरावर ब्राँझपदक मिळवले. एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या कु.मानसी ची आई गृहिणी आहे तर
वडील खाजगी कंपनी मध्ये कर्मचारी आहेत.
जिल्हा स्पर्धा नृसिंहवाडी,राज्य स्पर्धा धुळे व नॅशनल स्पर्धा लुधियाना (पंजाब)येथे संपन्न झाल्या.प्राथमिक शिक्षण अधिकारी सौ.मीना शेंडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस्.यांनी कौतुक केले.
तिला वर्गशिक्षक नाहीद मुजावर,सुखदेव शिंदे,हनुमंत खिलारी,सचिन हरोलीकर व मुख्याध्यापक प्रकाश रत्नाकर यांचे मार्गदर्शन लाभले तर विशेष मार्गदर्शन ओंकार मोरे डिफेन्स अकॅडमी,शिरोळ यांचे लाभले.नाथाजी नाईक पतसंस्थेने रुपये ५०००/- बक्षिस देऊन शुभेच्छा दिल्या.केंद्र प्रमुख आण्णा मुंडे,शिक्षण विस्तार अधिकारी,दिपक कामत,गटशिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी यांची प्रेरणा मिळाली.सरपंच सुहास खाडे,उपसरपंच अभिलाष कांबळे,सर्व सदस्य,अध्यक्षा प्रियंका खोंद्रे,उपाध्यक्ष नामदेव पाटील,सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती,सर्व विद्यार्थिनी,तरुण मंडळे, देवातात्या इंगळे,स्कूल कमिटी घालवाड,मुख्याध्यापक घालवाड हायस्कूल घालवाड,सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख,सर्व सहकारी पतसंस्था,दूध डेअरी,पाणीपुरवठा संस्था चेअरमन व पदाधिकारी,कुमार विद्या मंदिर घालवाड चे मुख्याध्यापक शरद सुतार व सर्व शिक्षक, शरद खाडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ घालवाड यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सौ.निलोफर फकीर यांनी शैक्षणिक साहित्य भेट देऊन अभिनंदन केले.

error: Content is protected !!