इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील जवाहर नगर परिसरात असणाऱ्या कबनूर हायस्कूल जवळ शाळेचे स्नेहसंमेलन झाल्यानंतर कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये जुना वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत प्रसाद डिंगणे व सौरभ पाटील यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात प्रसाद डिंगणे याचा जागीच मृत्यू झाला होता.तर सौरभ गंभीर जखमी झाला होता.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शुभम कोळेकर याच्यासह चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.यातील शुभम कोळेकरला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
इचलकरंजी शहरातील कबनूर जवाहरनगर परिसरामध्ये अल्पवयीन मुलांची सध्या गुंडगिरी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.गांजा व्हाइटनर व इतर अमली पदार्थ सेवन करण्यामध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा समावेश दिसू लागला आहे.सध्या चौकाचौकांमध्ये शहरांमध्ये अल्पवयीन मुले दमदाटी करणे मारामारी करण्यामध्ये सध्या जोर दिसू लागला आहे.शहरातील कबनूर हायस्कूल कबनूर येथे दोन मुलांमध्ये दहावी पासून वाद होता.गुरुवारी स्नेहसंमेलन सुरु असताना दोन गट एकमेकांसमोर आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला व एकमेकांच्याकडे बघून घेण्याची भाषा झाली. यानंतर प्रसाद हा स्नेहसंमेलन संपल्यानंतर बाहेर आल्यानंतर यातील चार अल्पवयीन मुलांसह शुभम कोळेकर यांनी प्रसाद डिंगणे व सौरभ पाटील याच्यावर चाकूने वार केले. यामध्ये प्रसाद डिंगणे याचा जागीच मृत्यू झाला,तर सौरभ पाटील हा जखमी झाल्यानंतर हल्लेखोर चार अल्पवयीन मुलांसह शुभम कोळेकर हे फरार झाले होते.जखमींना इंदिरा गांधी रुग्णात आणले असता यावेळी प्रसादचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तसेच सौरभ याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील येथे पाठवण्यात आले.पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत यामध्ये शुभम कोळेकर याच्यासह चार अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज शुभम कोळेकर याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच अन्य चार अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात पाठवण्यात केले आहे.चार ही आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा भीती नव्हती तसेच शुभम कोळेकरला वैद्यकीय तपासणीस नेत असताना मी काही केले नाही तीन महिन्यानंतर सुटून आल्यानंतर मी मोठा कांड करणार असा पोलिसांसमोर तो बडबडत होता.शुभम कोळेकर हा त्या ठिकाणी बोलवल्यानंतर घटनास्थळी गेला होता असं तो पोलिसांना सांगत होता मी हल्यानंतर तिथे गेलो होतो व मारामारी झाल्यानंतर प्रसाद माझ्या अंगावर पडला होता.अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदंडे हे करत आहेत.