शिरोळ / प्रतिनिधी
हातकलंगले विधानसभा मतदारसंघ हा राज्यात विकास कामामध्ये आघाडीवर राहील.हा मतदारसंघ राज्यात विकासाचे मॉडेल बनविणार या मतदारसंघाबरोबर शिरोळ शहरांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याची असल्याचे प्रतिपादन आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने यांनी केले. येथील मेस्त्री कट्टा ग्रुप, व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने शिरोळचे सुपुत्र हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील नूतन आमदार डॉक्टर दलित मित्र अशोकराव माने यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले की माझ्या विजयामध्ये शिरोळ मधील नागरिकांचाही सिंहाचा वाटा आहे.हातकलंगले विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दुजाभाव न करता मला जिल्ह्यात दोन नंबर व राज्यात दहाव्या क्रमांकाची उच्चांकी मते देऊन निवडून दिले.त्यांचे ऋण मी फेडू शकत नाही.शासनाच्या विविध योजनेचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असे आश्वासन त्यांनी शेवटी बोलताना दिले.प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बजरंग काळे (गुरुजी) यांनी केले.यावेळी अमरसिंह पाटील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास आयुब मेस्त्री,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बी.जी.माने,शिवाजीराव गावडे, शिवाजीराव सांगले,राजू देसाई,दिलीप माने,सुजित पाटील,वैभव माने,परवेज मेस्त्री,बबन बन्ने,दादा कोळी,पत्रकार संतोष पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.