शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील कल्लेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या मैदानात आज गुरुवारी आरटीओ कॅम्प आयोजित करण्यात आला.या कॅम्पमध्ये लायसन्स आणि वाहन नोंदणीसह आरटीओ संदर्भातील सर्व कामे पार पडली.शिरोळ येथील नागरिकांना वाहन नोंदणी, लायसन्स,फिटनेस प्रमाणपत्रे,तसेच इतर आरटीओ सेवा मिळवण्यासाठी ही कॅम्प एक महत्त्वाची संधी ठरली.या कॅम्पचे उद्घाटन शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैय्या,आरटीओ विजय इंगवले आणि माजी नगरसेवक दयानंद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी नगराध्यक्ष पाटील यांनी नागरिकांना कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन केले,तसेच आरटीओ संबंधित सर्व सेवांचा उपयोग करण्याचे महत्त्व सांगितले.आरटीओ विजय इंगवले यांनी देखील शिरोळ मध्ये झालेल्या या कॅम्पच्या आयोजनाची महत्त्वता स्पष्ट केली.कार्यक्रमाला माजी सैनिक तसेच शिरोळ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कॅम्पमुळे शिरोळ येथील नागरिकांना आरटीओ संबंधित विविध सेवा मिळविण्यात सुलभता निर्माण झाली. उपस्थित नागरिकांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन दिले गेले.हा कॅम्प शिरोळ मधील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि सोयीची सुविधा ठरली असे आयोजकांनी सांगितले.यावेळी आरटीओ सुनील उगले,
गणपतराव मशाळकर,प्रवीण सातरे,रचना जाधव,शरीफ मोमीन,अरुण माने,वाय एम पाटील गुंडा मस्के यांच्यासह वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणपतराव मशाळकर,प्रवीण सातरे,रचना जाधव,शरीफ मोमीन,अरुण माने,वाय एम पाटील गुंडा मस्के यांच्यासह वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.