गर्भवती महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासरा यांना पोलीस कोठडी

Spread the love
इचलकरंजी / प्रतिनिधी 
इचलकरंजी येथील कलानगर येथे राहणाऱ्या निकिता सत्यम केसरवानी वय वर्ष 22 या गर्भवती महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळपास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सत्यम केसरवाणी,सासरा मुनीमचंद केसरवानी,सासू विमल केसरवणी व दिर सोनू मुनीमचंद केसरवानी यांना चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला होता,यापैकी पती सत्यम केसरवाणी सासरा मुनीमचंद केसरवानी या दोघांना अटक केली आहे तर सासू विमल केसरवणी व दिर सोनू केसरवानी हे दोघे फरार आहेत.आज इचलकरंजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात पती सत्यम केसरवाणी व सासरा मुनीमचंद केसरवानी या दोघांना हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजी शहरातील कलानगर परिसरात राहणाऱ्या निकिता सत्यम केसरवानी वय वर्ष 22 या गर्भवती महिलेने गळपास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना बुधवार पहाटे उघडकीस आली होती.मात्र निकिता केसरवाणी हिने आत्महत्या केली नाही.तर सासरच्या मंडळीनी तिचा खून केला असल्याची फिर्याद निकीताचे आई वडिल व भाऊ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी पती सत्यम केसरवाणी,सासरा मुनीमचंद केसरवानी,सासू विमल केसरवणी व दिर सोनू मुनीमचंद केसरवानी यांना चौघानी मारहाण करून माहेरून पैसा आणण्यासाठी तगादा लावून निकीताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या चौघापैकी पती सत्यम केसरवाणी, सासरा मुनीमचंद केसरवानी यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर सासू विमल केसरवणी व दिर सोनू मुनीमचंद केसरवानी हे फरार असून त्याचा शिवाजीनगर पोलीस शोध घेत आहेत.सत्यम व निकिताचा पाच वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता.विवाह झाल्यानंतर सत्यम व त्याचे आई – वडील निकिताकडे वारंवार पैशाची मागणी करत होते. निकिताच्या आई-वडिलांनी मागणीनुसार जावई सत्यमला पैसेही दिले होते,पण तरीसुद्धा निकिताला पती सासू-सासरे वारंवार तिला मानसिक छळ करून तिला मारहाण करत होते ते सुद्धा ती सहन करत होती.निकिताला दोन वर्षाचा मुलगा आहे.तसेच ती पाच महिन्याची गरोदर आहे याची पर्वा सासरे पती करत नव्हते तसेच तिला मारहाण करत होते काल सुद्धा आईवडिलांकडून पैसे आन अशी मागणी करून तिला मारहाण केली व तिला खोलीत बंद केले होते याचाच मनात राग धरून निकिता हिने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.याची माहिती पतीला कळताच पतीने मृतदेह खाली काडून घेतला याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून निकिताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.मात्र निकिताच्या आई-वडिलांनी आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा छळ करून तिला मारण्यात आले आहे असा आरोप केला होता याची दाखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी सत्यम केसरवानी व त्याचे वडील यांना अटक केली आहे.

error: Content is protected !!