इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील जय भीमनगर मधील १०८ घरकुलाचे काम अपूर्ण असून या कामाचा निधी आलेला असून सुद्धा या घरकुलाचे काम अध्याप सुरु करण्यात आले नाही तरी ते काम सुरु करा करावे यासाठी आज जय भीम नगर मधील रहिवाश्यांनी महापालिका उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले.
इचलकरंजी शहरातील जय भीम नगर मधील सर्वपक्षीय बैठकीमध्ये 108 घराच्या संदर्भात बैठक झाली.या बैठकीमध्ये जयभीम नगर मध्ये ७२०घरांपैकी ६१२ घरे बांधून वाटप करण्यात आली आहेत.पण उर्वरित 720 घरांपैकी 612 घरे बांधून दिल्यानंतर राहिलेली 108 घर 2011 पासून पुनर्वसण्याच्या प्रतीक्षेत आहेत.विशेष म्हणजे 2011 पासून लाभार्थ्यांचे हीष्याचे पैसे भरलेले असून या हिश्याच्या रकमेचे व्याज पूर्वीची नगरपरिषद व आत्ताची महानगरपालिका हे वापरत आहेत,पण या गोरगरीब लाभार्थ्यांच्याकडे लक्ष देण्यास पूर्वीची नगरपरिषद व आत्ताची महानगरपालिका यांच्याकडे वेळ नाही यासाठीच लक्ष वेधण्यासाठी जय भीम नगर मधील सर्व सामाजिक व सर्व घरकुलधारक या बैठकीमध्ये येत्या दहा ते पंधरा दिवसात जर याचा निर्णय न झाल्यास अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आले. या संदर्भात महापालिका उपायुक्त यांना 108 घरामधील सर्वपक्षीय नेते व घरकुलधारक या सर्वांच्या वतीने निवेदन देण्यात आले उपायुक्त यांनी येत्या चार ते पाच दिवसात याचा काही दिवसात काय स्टेटस आहे हे पाहून सांगतो असे आश्वासन दिले.त्यानंतर येत्या ४ दिवसात यावर त्वरित निर्णय घेऊन आपणास या संदर्भात योग्य ते पाठ पुरावा देऊ असे आश्वासन दिले.हे जर आश्वासन पूर्ण झाले नाही तर येथे दहा दिवसानंतर आमरण उपोषणाचा इशारा
यावेळी उपयुक्त्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.यावेळी बाबासाहेब जाधव,संजय गेजगे,अमर पारडे,विठ्ठल शिंदे, तानाजी सोनवणे,विश्वास बचुटे,सचिन पाटील,संजय निकाळजे,सचिन सोलवंडे,तुषार टेकाळे,मुकेश जविर, जितू ताकपिरे,राहुल वाघमारे,नेताजी लोखंडे,छगन जाधव व अनेक घरकुल धारक उपस्थित होते.