दारूच्या नशेत बसवर दगडफेक ३ प्रवासी जखमी

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

शिरोली पुलाची ता. हातकणंगले येथील दिल्ली दरबार हाॅटेल जवळ एका व्यक्तीने दारूच्या नशेत बसवर दगडफेक केल्याने बसमधील तिन प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले.कोल्हापूरहून शिरोली माळवाडी व पेठवडगाव कडे निघालेल्या केएमटी बसवर नागेश अर्जुन वाईडे रा.जालना याने दारूच्या नशेत दगडफेक केल्याने बस मधील राहूल सुनीलकुमार चोपडे वय २५ (भादोले ) , संचिता नितीन कांबळे ( वय १७ ) स्नेहल सुनिल कांबळे (वय २१ ) हे तिघे प्रवासी गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर प्राथमिक उपचारासाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राहूल हा भादोले गावचा रहिवाशी असून तो कामानिमित्त कोल्हापूर येथे गेला होता आपले काम उरकून तो पेठवडगाव केएमटी बसने गावाकडे जात होता.तर संचिता व स्नेहल या भुये ता.करवीर गावातील असून त्या नाताळ सणानिमित्त शिरोली येथे आपल्या नातेवाईकाकडे आल्या असताना या व्यक्तीने दोन्ही बस शिरोली फाट्या शेजारी असणाऱ्या दिल्ली दरबार हाॅटेल जवळ आल्यावर त्याने बसवर दगडफेक केल्याने हे तिघे जखमी झाले हि घटना मंगळवारी घडली.दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी काही तरूण मोटरसायकलवरून गेले असता त्याना तो सापडल्याने त्याला शिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले . आज पुलाची शिरोली येथे परभणीतील घटनेच्या निषेधार्थ गाव बंद करण्यात आला होता.अत्यंत शांततेत सर्व पक्षीय बंद पार पडला असताना बसवर दगडफेक करण्यात आली पण याचा बंद आंदोलनाशी कसलाही संबंध नव्हता. आरोपी मद्यपी असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

error: Content is protected !!