इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी लायकर मळा येथील राजवर्धन प्रशांत लवटे वय 14 हा वैरण आणण्यासाठी बैलगाडी घेऊन गेला असता बैलगाडी पलटी होऊन त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.याची माहिती मिळताच राजवर्धनचे वडील व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.ही घटना आज शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.सदर घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.याबाबत सविस्तर माहिती की
इचलकरंजी शहरामधील प्रशांत लवटे हे आपल्या परिवारासह गुरु कन्नन नगर कोकरे मळा या भागात कित्येक वर्षापासून राहण्यास आहेत.त्यांची शेती पंचगंगा नदी काठावर आहे त्यांचा मुलगा राजवर्धन सध्या एका खाजगी शाळेमध्ये नववी मध्ये शिकत आहे.शाळा शिकत शिकत तो शेतीची ही कामे करत होता आज दुपारच्या सुमारास राजवर्धन लवटे हा बैलगाडा घेऊन वैरण आणण्यासाठी शेताकडे जात होता.यावेळी बैलगाडा पलटी होऊन यातील राजवर्धन लवटे व त्याचे अन्य दोन साथीदार शेतीच्या बांधाच्याकडेला पडले यामध्ये राजवर्धन लवटे याच्या डोक्याला जबर मार लागला.सोबत असणाऱ्या मित्रांनी शेतकऱ्यांना व नातेवाईकांनी याची माहिती दिली.नातेवाईक व शेतकऱ्यांनी तात्काळ राजवर्धन लवटे याला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राजवर्धन हा वडीलांना मोठा आधार होता.राजवर्धनचा अशा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे.त्याच्या वडिलांनी रुग्णालयामध्ये एकच आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. राजवर्धनच्या अपघाताची बातमी समजताच नातेवाईक व मित्रपरिवारनी इंदिरा गांधी रुग्णाला बाहेर मोठी गर्दी केली होती.या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.