इचलकरंजी / प्रतिनिधी
मैत्रिणीला चुकीची माहिती सांगत असल्याच्या गैरसमजातून इमरान हल्लाबक्ष विजापूर याच्यावर झालेल्या सशस्त्र हल्ला प्रकरणे शिवाजीनगर पोलिसांनी अलोक धोंडीराम माने वय 21 राहणार शाहूनगर चंदुर आणि रोहन जयपाल लोखंडे वय वर्ष 24 राहणार नारळ चौक या दोघांना अटक केली आहे.आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता दोघांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावले असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसातून मिळाली.इमरान विजापूर हे आणि अलोक माने हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे असून अलोक हा मैत्रिणीला चुकीची माहिती सांगत असल्याबद्दल इमरान याचा गैरसमज होता या कारणातून या दोघांच्या अनेकदा वाद होता त्याच पूर्वीच्या वादातून अलोक आणि त्याच्या साथीदारांनी इमरान याच्यावर सशस्त्र हल्ला करून जखमी केले होते.या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.दरम्यान आज शनिवार संशयित अलोक माने आणि रोहन लोखंडे या दोघांना अटक केली आहे.अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत