शिरोळ / प्रतिनिधी
श्री.शंकर भाऊ कोळी(चिंतामणी)रा.शिरढोण यांची नात व गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनि.कॉलेजचे पर्यवेक्षक श्री.सुरेश शंकर कोळी यांची ज्येष्ठ कन्या चि.सौ.कां. स्नेहा व स्व.राजकुमार महादेव माने रा.पंढरपूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि.ओंकार यांचा शुभ विवाह शनिवार दि.२१ डिसेंबर २०२४रोजी टारे मंगल कार्यालय,शिरोळ येथे संपन्न झाला.वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी दत्त उद्योग समूहाचे चेअरमन,सहकारमहर्षि गणपतराव पाटील, जवाहर साखर कारखान्याचे संचालक सूरज बेडगे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,माजी पक्षप्रतोद विजयराव भोजे,युवा नेते पृथ्वीराज यादव, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील,दत्त साखर शिरोळ चे संचालक दरगू गावडे, माजी सरपंच गजानन संकपाळ, दस्तगीर बाणदार,कुरुंदवाडचे माजी नगरसेवक राजू आवळे,भगवान कोळी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप कोळी,विश्वास बालिगाटे,डॉ.कुमार पाटील, बाळासाहेब निपाणे,मारूती कोळी,अशोक कोळी, शिवाजी कोळी, सुभाष कुरुंदवाडे,सहदेव माळी,दिलीप शिरढोणे,शहाबुद्दीन टाकवडे,बाबूराव कोईक,बजरंग काळे,विनायक मगदूम, शिरोळचे माजी नगरसेवक दादा कोळी,विजय कुडचे,यांचेसह राजकीय,सामाजिक, शैक्षणिक,प्रसारमाध्यम या क्षेत्रातील मंडळी,आप्तेष्ट, मित्रमंडळी उपस्थित होते.शुभविवाह प्रसंगी सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थांना रोख स्वरूपात मदत देवून समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला.त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्याध्यापक रमेश कोळी यांनी आभार मानले.