विद्या मंदिर भैरववाडी,कुरुंदवाड केंद्रस्तर सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

मजरेवाडी केंद्रांतर्गत २०२४-२५सालातील क्रीडा, सांस्कृतिक कुरुंदवाड व तेरवाड येथे स्पर्धा पार पडल्या.मजरेवाडी केंद्रातील १२ शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता.सदर स्पर्धेत विदया मंदिर भैरववाडी,कुरुंदवाड या शाळेने खालील यश मिळविले.लहान गट कबड्‌डी – व्दितीय क्रमांक,मोठा गट रिले तृतीय क्रमांक,लहान गट – मुले -१०० मी. धावणे – प्रथम क्रमांक तनिश अतुल नरके,व्दितीय क्रमाक – सार्थक आलासे,मोठा गट मुले ४०० मी. धावणे -द्वित्तीय क्रमांक – संस्कार म्हाळू कोळेकर,सांस्कृतिक स्पर्धा – प्रश्नमंजूषा – मोग गट- प्रथम क्रमांक,लहान गट द्विलीय क्रमांक,कथाकथन मोठा गट कु. समिधा बंडगर – तृतीय क्रमाक, कथाकथन – लहान गट – कु.आराध्या सुशांत जाधव तृतीय क्रमांक,समूह‌गीत – मोठा गट – तृतीय क्रमांक,नाट्यीकरण मोठा गट -तृतीय क्रमांक
शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय गायकवाड यांचे मार्गदर्शन व शिक्षकाचे नियोजनामुळे शाळेला उल्लेखनीय या मिळाले.या यशामुळे गावक-यांच्यात समाधान पसरले असून भैरववाडी शाळेचे या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!