हातकणंगले / प्रतिनिधी
सांगली -कोल्हापूर महामार्गावर हातकणंगले हद्दीत हॉटेल ग्रासहोपर समोर भरघाव चारचाकीची जोराची धडक बसुन दूचाकी वरील 35 वर्षीय अशितोष दिलीप कांबळे राहणार भारतनगर हातकणंगले या युवकाचा जागीच मृत्यु झाला.हा अपघात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी हातकणंगले येथील अशितोष कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत नोकरीस होते.आज दुपारीच्या दरम्यान सांगली -कोल्हापुर रस्त्यावरील बुधले मंगल कार्यालय इथं एका विवाहास उपस्थित राहण्यासाठी इचलकरंजीहून कांबळे हे आपल्या दूचाकी क्रमांक एमएच ०९ एल डी ७९९६वरून निघाले होते. मंगल कार्यालयानजीक आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने कोल्हापूरहून अक्कलकोटकडे निघालेल्या चारचाकी क्रमांक एम एच ०९ जी एम ७१७६ ने पाठीमागून जोराची धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की चारचाकी वाहनाने मयत कांबळे यांच्यासह दूचाकी वाहनाला शंभर फूट फरपटत नेले.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यु झाला.चारचाकी वाहन चालक संदीप अर्जुन पाटील यास हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मयत कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत अनुकंपा तत्वांवर नोकरीस होते. कुटूंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांना लहान दोन मुले असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. आशितोष याच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.