शिरोळ / प्रतिनिधी
गत हंगामातील उसास 200 रुपये मिळावे आणि चालूला 3700 रुपये मिळावेत म्हणून शिरोळ तहसील समोर आंदोलन अंकुशचे सोमवार पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.दोन दिवसापूर्वी साखर सह संचालक यांनी कारखानदार आणि आंदोलन अंकुशची बैठक लावणार असल्याचे सांगितले होते पण बैठक लावली नाही म्हणून येत्या सोमवारी 23 डिसेंबर रोजी हालगी बजावो आंदोलन करणार असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी आज गुरूवार दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता आंदोलनस्थळी सांगितले.धरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शिरटी आणि हसूर गावचे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.आजच्या धरणे आंदोलनात धनाजी चुडमुंगे, पिंटू ढेकळे,देवेंद्र चौगुले,धनंजय जगनाडे,
विलास भोसले,उदय रोठे,शांतीनाथ खवाटे, काशिनाथ पुजारी,बाबुराव मानगावे,कुमार सुतार, संजय कोळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.