कोयता व स्टील रॉडने तिघांवर हल्ला केल्याप्रकणी एकावर गुन्हा दाखल

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथील भाग्यरेखा टॉकीजजवळ धारधार कोयता व स्टील रॉडने हल्ला करून तिघांना जखमी केल्याप्रकणी इचलकरंजी येथील अनुराग कांबळे पूर्ण नाव समजू शकले नाही याच्या विरोधात आज गुरूवार दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता संकेत हत्तीकर वय वर्ष 21 राहणार लाल नगर कामगार चाळ इचलकरंजी याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.याबाबत पोलिसातून व फिर्यानुसार मिळालेली माहिती अशी की संकेत हत्तीकर व अनुराग कांबळे हे एकमेकांचे तोंड ओळखीचे आहेत.बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्री साडे सात वाजता संकेत हत्तीकर व त्यांचे मित्र नाष्टा करुन परत येत असताना यातील अनुराग कांबळे यांने संकेत हत्तीकर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व अनुरागने अचानक कानाखाली मारली त्यावेळी अनुरागसोबत असणाऱ्या अन्य चार ते पाच जणांनी विनाकारण संकेतला मारहाण केली. दरम्यान मारहाण होत असताना संकेतचा मित्र आदित्य कुडाळकर हा सोडविण्याकरीता आला असता त्याला देखील लाथाबुक्याने मारहाण केली.यामध्ये संकेत यांचे डावे हातास व पायास कोयत्याच्या उलट्या बाजुने मारहाण करुन  जखमी केले.हल्ल्यानंतर जखमी आदित्यचे वडील संजय कुडाळकर हे मोटर सायकल आणण्यासाठी गेले असता त्यांना देखील स्टील राँडने डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी संकेत हत्तीकर याच्या फिर्यादीवरून अनुराग कांबळे यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हेडकोन्स्टबल शिंदे करत आहेत.

error: Content is protected !!