केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या राजेश शिंदेनी व्यक्त केला निषेध

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधानावर चर्चा करण्यात आली.या चर्चेदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आंबेडकर आंबेडकर हे शब्द फॅशन झाले आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हा संघटक राजेश शिंदेनी यांनी आज गुरूवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता जयसिंगपूर येथील क्रांती चौकात गृहमंत्री अमित शहांचा जाहीर निषेध केला. राज्यसभेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक वक्तव्य केलं.यावेळी अमित शाह म्हणाले की,आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे.सगळीकडे आंबेडकर, आंबेडकर,आंबेडकर,म्हणायचे.त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते,तर स्वर्गात जागा मिळाली असती,असे शाह म्हणाले. शाहांनी केलेल्या या वक्तव्यांचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत.या वक्तव्याचा जयसिंगपुरात ही राजेश शिंदेनी तीव्र निषेध केला आहे.

error: Content is protected !!