पंचगंगा पाणी प्रदूषणामुळे मृत्यु झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दारात मृतदेह दफन करू – बंडू पाटील

Spread the love

पंचगंगा नदीच्या प्रवाहात पुन्हा काळेकुट्ट रसायनयुक्त पाणी आल्याने नदीचे पाणी दूषित झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या आठवड्यातील प्रदूषणामुळे जलचरांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्यानंतर आठवड्याभरातच ही घटना पुन्हा घडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष बंडू पाटील यांनी आज बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्रदूषण नियंत्रण मंडळावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी बंडू पाटील म्हणाले प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे दोषी उद्योग बेफिकीर झाले असून त्यांनी पुन्हा नदीत रसायने सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “प्रशासनाला नियमभंग दिसत नाही का?” असा सवाल संतप्त उपस्थित केला आहे.पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार आहे.पिण्याचे पाणी,शेती आणि मासेमारी यासाठी नदी महत्त्वाची आहे. मात्र,रसायनिक स्रावांमुळे पाणी विषारी होत आहे.यामुळे शेतीच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असून जलचरांवर प्रतिकूल परिणाम होत आहे.दूषित पाण्यामुळे मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे.गेल्या आठवड्यात बंधाऱ्यावर स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आंदोलन करून रासायनिक प्रदूषण रोखण्याची मागणी केली होती. मात्र, आश्वासनांव्यतिरिक्त ठोस कारवाई झाली नाही.जर प्रशासनाने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत,तर पंचगंगा वाचवण्यासाठी मोठ्या जनआंदोलनाची तयारी केली जाईल असा इशारा बंडू पाटील यांनी दिला आहे.

error: Content is protected !!