श्री रेणुका मंदिरात यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ प्रतिनिधी येथील श्री यल्लमा देवी यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आगर रोड वरील माळी मळा येथील श्री यल्लमा देवीच्या मंदिरात गुरुवार १९ डिसेंबर रोजी सकाळी  भाजी भाकरीचा नैवेद्य सायंकाळी सात वाजता कीच (काकणे) काढणे, वाढविणे व आंबील यात्रा संपन्न होणार आहे.प्रति वर्षाप्रमाणे येथील रेणुका मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे अभिषेक,आरती, देवीस भाजी भाकरीचा नैवेद्य सायंकाळी सात वाजता किच व आंबील वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.हा सोहळा श्री रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष दिलीप माने,उपाध्यक्ष रणजीत जगदाळे, सचिव गजानन सावंत यांच्यासह भाविक भक्तांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.मंदिराचे पुजारी राजाराम भैरु माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार असून भाविकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री रेणुका भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!