परभणी घटनेच्या निषेधार्थ टोप येथे कडकडीत बंद

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

परभणी घटनेच्या निषेधार्थ टोप येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने कडकडीत गाव बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला.परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची एका माथेफिरूने विटंबना केल्याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील टोप येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने ग्रामपंचायत तसेच विविध संस्थांना निवेदन देत गाव बंदचे आव्हान करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत गावातील व्यापारी वर्ग, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी पाठिंबा व्यक्त करत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला.यावेळी गावांमध्ये बंद शांततेत पाळण्यात आला. सकाळी आकरा वाजता बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेऊन घटनेचा तीव्र निषेध केला.यावेळी शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी ही गावातील व्यापाऱ्यांना व बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांना गाव शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले .यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जमलेल्या सर्व भिमसैनिक ग्रामस्थांना परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त केला.या आंदोलनात शहिद झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी श्रद्धांजली अर्पण करून बंद चे आवाहन केले.

error: Content is protected !!