हेरले येथे संजय गांधी योजना मंजुर आदेश पत्र वाटप

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

हेरले ता.हातकणंगले तालुक्यातील पात्र गरजू गरीब लोकांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मिळणारे मानधन वाढवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन माजी खासदार निवेदिता माने यांनी दिले. त्या हेरले इथं भाजपा महायुतीच्या वतीने आयोजित लाभार्थी मंजूर आदेश वाटप प्रसंगी बोलत होत्या.याबाबत अधिक माहिती अशी की, हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने भाजपा उपाध्यक्ष संदीप मुंडे यांनी संजय गांधी निराधार योजनेतील साठ पात्र लाभार्थीना मंजूर आदेश वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी बोलताना माजी खासदार डॉ निवेदिता माने म्हणाल्या महायुती सरकारने राज्यामध्ये उत्कृष्ट काम केले आहे.खासदार धैर्यशील माने यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून लाभार्थ्यांचे मानधन वाढ करण्यासाठी प्रयत्न करू हातकणंगले तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना कमिटीचे काम उत्कृष्ट आहे.कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यापर्यंत जाऊन त्यांचे अर्ज भरून घेऊन त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी आम्ही सहकार्य करू असे आश्वासन दिले.यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुका कमिटी अध्यक्ष झाकीर भालदार,भारतीय जनता युवा मोर्चाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अरविंद माने,पत्रकार अनिल उपाध्ये, सयाजी गायकवाड,भाजपा उपाध्यक्ष संदीप मुंडे,भारतीय जनता पार्टी ओबीसी तालुका आघाडी उपाध्यक्ष प्रशांत  माळी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी भाजपाचे श्रीकांत पाटील,सचिन तेरदाळे,अमोल मोहिते, सौरभ भोसले, सविता माने

error: Content is protected !!