परभणी घटनेच्या निषेधार्थ कुरुंदवाड आंबेडकरवादी संघटनांचे निरदर्शने

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

परभणी शहरातील अत्यंत निंदनीय घटनेच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील विविध आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.कुरुंदवाड पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आंबेडकरवादी संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन सुरू केले.कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. “समाजद्रोही आणि राष्ट्रद्रोही कृती करणाऱ्यांना माफी नाही,” अशा घोषणा देत दोषींना कठोर शिक्षा करण्याचा आग्रह धरला.धम्मपाल ढाले, संजय शिंदे, सतीश भंडारे, शशिकांत तोबरे यांनी शासनाला इशारा देत दोषींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी केली. या घटनेमुळे समाजातील शांतता भंग झाली असून, ती समाजाच्या एकोप्याला आणि राष्ट्राच्या मुलभूत तत्त्वांना धक्का देणारी असल्याचे सांगितले.कारवाई झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल.यावेळी आंदोलकांनी पोलीस ठाण्याला धडक देत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळी आंदोलनात दिनेश कांबळे,शाहीर आवळे,राजेंद्र देवकाते यांच्यासह आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!