संविधान प्रतिमेची विटंबनेच्या निषेधार्थ माणगाव कडकडीत बंद

Spread the love

माणगाव / प्रतिनिधी

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल माणगाव गावामध्ये आज शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता निषेध व्यक्त करून गाव दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना परभणी येथील माथेफिरू समाजकंटकाकडून दिनांक 10 डिसेंबर रोजी केली आहे.ही घटना अतिशय निंदनीय आहे.संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध एक मताने होत आहे.या घटनेच्या निषेधार्थ माणगांव गाव बंद ठेवले.बौद्ध समाजातील सर्व अनुयायानी व ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सुनील चव्हाण,नंदकुमार शिंगे,शिरीष मधाळे,योगेश सनदी यांनी मनोगतातून निषेध व्यक्त केला.या बंधला माणगांव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील पाठिंबा दर्शवला.या निषेध सभेस योगेश कोठवळे,निलेश गवळी,बाबासो सनदी,बाबासो कांबळे, नितीन गवळी,बाबुराव कांबळे,रोहित गवळी,भिकाजी शिंगे,बाळासो कांबळे, राहुल गवळी,सुभाष गवळी,फारुख नदाफ, दिग्विजय कांबळे,अक्षय बिराजे,अवि सनदी प्रतीक कांबळे, अनमोल कांबळे,सचिन कांबळे तसेच बौद्ध समाजातील इतर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!