बांगलादेशातील हिंदू समाजाचे अस्तित्व धोक्यात – बाळ महाराज

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात इचलकरंजीत सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मानवाधिकार हुंकार मोर्चा काढण्यात आला.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना देण्यात आले. बांगलादेशमध्ये हिंदूंवरील वाढत्या अत्याचाराचा संपूर्ण जागतिक स्तरावर निषेध व्यक्त करण्यात येतआहे.हिंदू संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी या अत्याचाराचा निषेध केल्यामुळे त्यांच्यावर बांगलादेशी सरकारने राजद्रोहाचा खटला दाखल करत त्यांना अटक केली आहे. बांगलादेशातील पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर दोन हजारपेक्षा अधिक हल्ले झाले.त्यामध्ये हिंदूंची घरे, व्यवसाय,मंदिरे जाळण्यात आली.हे सर्व अत्याचार लपविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्यात आले.वाढते अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत,तर बांगलादेशातील हिंदू समाजाचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.या मोर्चात आमदार राहुल आवाडे,बाळ महाराज,सनतकुमार दायमा,गजानन महाराज, जवाहर छाबडा,पुंडलिकभाऊ जाधव,प्रसाद जाधव,अमित कुंभार,विजय पाटील, सर्जेराव कुंभार,प्रवीण सामंत,पै.अमृतमामा भोसले, बाळकृष्ण तोतला, सौ.अश्‍विनी कुबडगे, मंगेश मस्कर, निलेश आमणे,नागेश पाटील आदींसह इचलकरंजीतील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!