कर्नाटक सरकारकडून छ संभाजी महाराज चौकात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करत संचार बंदी लागू

Spread the love
बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून बेळगाव मध्ये सुरुवात होते.

याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगाव मध्ये महामेळावा घेण्याचं नियोजन आहे ते करण्यात आले होते. बेळगावच्या वॅक्सिंग डेपो मैदानावर हा सगळा महामेळावा आहे तो होणार होता मात्र या सगळ्या महामेळाव्यासाठी कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळवा होणाऱ्या बेळगाव येथील व्हॅक्सीन डेपो मैदान परिसरामध्ये आज दिवसभरासाठी संचार बंदी लागू करण्यात आली आहे.मात्र या सगळ्या घटनेनंतर ही महाराष्ट्र एकीकरण समितीने छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आम्ही एकत्र येणार आणि कर्नाटक सरकारचा निषेध करू असा इशारा दिला असल्याने छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये देखील मोठा पोलीस फौज फाटा या ठिकाणी कर्नाटक प्रशासनाकडून तैनात करण्यात आला आहे.जवळपास शंभर ते दीडशे वरीष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी या ठिकाणी आल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.व्हॅक्सीन डेपो मैदान व छत्रपती संभाजी महाराज चौकात महाराष्ट्र एकीकरण समितीचा  कोणताही पदाधिकारी किंवा मराठी भाषिक जमणार नाहीत याची खबरदारी कर्नाटक पोलिस आणि प्रशासनाने घेतलेले आहे.आजच्या या सगळ्या प्रकाराने कर्नाटक प्रशासनाकडून कशा पद्धतीने मराठी भाषकांवर दडपशाही सुरू आहे.दरम्यान या महामेळाव्यासाठी  महाराष्ट्र व इतर राज्यातील मराठी भाषिक बेळगाव मध्ये येणार होते त्यांची देखील तपासणी करून त्यांना बेळगाव शहराबाहेरच अडवण्याचा नियोजन देखील कर्नाटक सरकारकडून करण्यात आलेल आहे.या ठिकाणी मोठा पोलीस फौज फाटा व संचार बंदी लागू,महामेळाव्याला परवानगी नाकारलेली असली तरी देखील महाराष्ट्र एकीकरण समिती देखील महामेळावा व निदर्शने करण्यावर ठाम आहेत.महाराष्ट्रातून देखील काही नेते मंडळी छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये येण्याची शक्यता आहे.मात्र तसा अधिकृत निरोप मिळालेला नसला तरीही सगळी शक्यता गृहीत धोरण मोठा पोलीस पोटात या सगळ्या कर्नाटक पोलिसांनी संभाजी महाराज चौकामध्ये तैनात केला आहे.

error: Content is protected !!