अकिवाट येथे कृष्णा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

अकिवाट (ता. शिरोळ ) येथे कृष्णा नदीच्या पात्रात 40 ते 50 वयाच्या अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळले आहे.सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह कल्लाप्पा रायनाडे यांच्या शेताजवळील पाणवठ्याजवळ सापडले.घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती.सदरचा मृतदेह कुजल्याने ओळख पटलेली नाही. गावकामगार पोलीस पाटील सचिन कांबळे यांनी पोलीसात वर्दी दिली आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत.

error: Content is protected !!