दत्तवाड केंद्रांतर्गत शिष्यवृत्ती सराव परीक्षेला केंद्रप्रमुख संजय निकम यांचे विशेष सहकार्य

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षेला दिले जाणारे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे समाजातील सर्व घटकांचे लक्ष स्पर्धा परीक्षेकडे लागले आहे.जिल्हा परिषदांच्या शाळांतील मुलांना स्पर्धा परीक्षेसाठीचा पहिला टप्पा म्हणजे इयत्ता पाचव्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठीची पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा होय.शिरोळ तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी या गुणवत्तावाढीसाठी अनेक उपक्रमांची अंमलबजावणी यशस्वीरित्या करीत आहे.त्यातील एक भाग म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थाना सराव मिळणे आवश्यक असून सराव परीक्षा आयोजनासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते.त्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून दत्तवाड केंद्राचे केंद्रप्रमुख संजय रामचंद्र निकम यांनी स्वखर्चाने पहिल्या सराव चाचणी आयोजित केली.एकंदरीत १३० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.सराव चाचणी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी श्री अनिल ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाड केंद्राचे केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे,केंद्र मुख्याध्यापक कुमार सिदनाळे,मुख्याध्यापक रमेश कोळी,दत्ता कमते यांचेसह अध्यापक, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!