ऊसतोड मजुरांना रोटरी क्लब ऑफ शिरोळकडून मदतीचा हात

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

येथील रोटरी क्लब ऑफ शिरोळचे माजी अध्यक्ष, व माजी नगरसेवक पंडित काळे यांच्या शेतात ऊस तोडीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांना रोटरी क्लब ऑफ शिरोळकडून ब्लॅंकेट व चटईचे वाटप करीत मदतीचा हात देण्यात आला.गेल्या चार-पाच दिवसापासून पंडित काळे यांच्या शेतात ऊसतोड सुरू आहे.याकरिता ऊसतोड मजुरांचे दहा कुटुंब या ठिकाणी ऊसतोड करीत आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेसाठी पंडित काळे यांच्या सहकार्यातून रोटरी क्लब ऑफ शिरोळकडून ब्लॅंकेट व चटईचे वाटप करण्यात आले.तसेच ऊस तोडीसाठी आलेल्या इयत्ता नववीतील मुलीसाठी शैक्षणिक साहित्यही देण्यात आले.यावेळी रोटरी क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष सुनील बागडी, सेक्रेटरी डॉ अंगराज माने,खजिनदार दिनेश माने गावडे, रोटे पंडित काळे, नितीन शेट्टी,अविनाश टारे, मोहन माने, बापूसाहेब गंगधर,युवराज जाधव,शरद चुडमुंगे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ शिरोळचे सर्व सदस्य उपस्थित होते.
रोटी पंडित काळे यांनी यावर्षी ऊस लागणीपासूनच ऊस उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या शेतात सुमारे ४२ ते ४५ कांड्यांचा ऊस तयार झाला आहे.एकरी ९० टन ऊस उत्पादन झाले आहे.यामुळे रोटरी क्लबच्यावतीने पंडित काळे यांचे अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!