अंबप खून प्रकरणी शफीकच्या घरावर कोयता आणि तलवार घेऊन हल्ला

Spread the love

अंबप / प्रतिनिधी

 

हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील 19 वर्षीय यश किरण दाभाडे या तरुणाचा खून झाला होता या प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील शफिक उर्फ जोकर शौकत मुल्ला या संशयीताला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे.शफीक हा मूळचा पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील रहिवाशी असून सद्या त्याचे अंबप येथील वैभवनगरमध्ये राहत आहे.खुनाच्या रागातून गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी सायंकाळ सुमारास सात आठ अज्ञात तरुणांनी हातामध्ये कोयता आणि तलवार घेऊन शफीकच्या घरावर हल्ला केला.यावेळी घरामध्ये शफिकचे आई एकटीच होती.हत्यार घेऊन आलेल्या तरुणांना पाहून त्या दुसऱ्या मजल्यावर गेल्या आणि खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला.हल्लेखोर तरुणांनी घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान केलं आहे.या हल्ल्या प्रकरणी आज कोडोली पोलीस ठाण्यात सात ते आठ अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती सायंकाळी 7 वाजता कोडोली पोलिसातून मिळाली.

error: Content is protected !!