श्री विश्व शक्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भेटवस्तू वाटप

Spread the love

कुरुंदवाड  प्रतिनिधी / नागेश गायकवाड

श्री. विश्व शक्ती गणेशोत्सव मंडळ मजरेवाडी यांची स्थापना होऊन 51 वर्षे आज रोजी पूर्ण होत आहेत त्यानिमित्त विश्वशक्ती गणेशोत्सव मंडळाने आज पर्यंत सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट प्रकारे काम केलेले आहेत 51 वर्षाच्या निमित्ताने या मंडळाच्या वतीने मजरेवाडी गावातील व माळभागातील सर्व 650 कुटुंबाना भेटवस्तू म्हणून स्टील ग्लास वाटप करण्यात आले आहेत तसेच या मंडळासाठी कै दत्तात्रय बंडू सूर्यवंशी यांचा सिंहाचा वाटा आहे
हे मंडळ त्यांनीच स्थापन केलेली आहेत तसेच या मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांचं अनमोल सहकार्य लाभले आहे शिवाय विनायक ( भैया,) नरुटे संदीप गावडे, मारुती सूर्यवंशी, अमोल नरुटे, अभिजीत शिंदे, शंतीनाठ दत्तवाडे, संकेत खेमाने, सम्मेद खेमाने, सुदर्शन नरूटे तेजस नरूटे अमर पाटिल, सुशांत बंडगार, प्रतीक खेमाने, यांचे उत्कृष्ठ नियोजन असलेने मंडळाची प्रगती झपाट्याने झाली आहे याशिवाय इतर सदस्य सर्व हिरीरीने भाग घेऊन उत्तम प्रकारे कार्य करत असतात या मंडळाने प्रत्येक वर्षी महिला दिनाचा कार्यक्रम घेउन बक्षीस वितरण कार्यक्रम घेत असतात अशा एक ना अनेक प्रकारे कार्यक्रम व उपक्रम राबवून गेली 51 वर्षे मंडळाने अथक परिश्रम घेऊन या मंडळाची जपणूक केलेली आहेत व दरवर्षी मोठ्या प्रकारे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतात त्यांना मंडळातील सभासद तसेच गावातील सर्व समाजातील नागरिक बंधू-भगिनी यांनी हातभार लावतात

error: Content is protected !!