छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी गंगामाईच्या 5 खेळाडूंची निवड

Spread the love

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी गंगामाईच्या 5 खेळाडूंची निवड

इचलकरंजी / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात. यावर्षी सदर स्पर्धा बुलढाणा येथे होत आहेत.या स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल संघामध्ये इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या पाच खेळाडूंची निवड झालेली आहे.यामध्ये समीक्षा काशिलिंग मिठारी,रोझा समीर कलावंत,अनन्या अमोल मळोद, श्रावणी प्रमोद रवंदे,सादिया जमालशाह फकीर यांचा समावेश आहे.सर्व खेळाडूंना क्रीडाविभाग प्रमुख प्रा. शेखर शहा, क्रीडाशिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे, उपप्राचार्य श्री आर.एस. पाटील, पर्यवेक्षक श्री व्ही. एन. कांबळे, पर्यवेक्षक श्री एस. व्ही. पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, खजिनदार श्री राजगोपाल डाळ्या, मानद सचिव श्री बाबासाहेब वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर, विश्वस्त श्री अहमद मुजावर, विश्वस्त श्री महेश बांदवलकर तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे खेळाडूंना बहुमोल सहकार्य लाभले.
कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे श्री शिवाजी पाटील सर यांचे विशेष सहकार्य नेहमी लाभत असते.

error: Content is protected !!