शिरोळात दुकाने व आस्थापनावर फलक मराठीत लावण्याचे नगरपरिषदेकडून पत्रक जारी

Spread the love

शिरोळ हद्दीतील दुकाने व आस्थापनाचे फलक मराठीत लावण्याचे नगरपरिषदेकडून पत्रक जारी

शिरोळ / प्रतिनिधी चंद्रकांत भाट

शिरोळ नगरपरिषद क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे फलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये लावण्याबाबतचे परिपत्रक मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांनी शहरातील सर्व दुकाने व्यावसायिक उद्योजक आस्थापना यांना दिले आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ मधील कलम ३६ (क) नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीमध्ये असेल. त्याचबरोबर मराठी भाषे व्यतिरिक्त

इतर कोणत्याही लिपीतील नामफलक असू शकतील, परंतु मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरवातीलाच लिहणे आवश्यक असेल व मराठी भाषेतील अक्षरे इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांपेक्षा आकाराने मोठी असतील, अशी तरतूद करण्यात आली आहे.

त्याअर्थी, नगरपरिषद शिरोळ क्षेत्रातील सर्व दुकानदार, आस्थापना धारक, विक्रेते यांनी आपल्या आस्थापनेच्या नामफलकाबाबत वरीलप्रमाणे देवनागरी लिपीतील मराठी भाषेतील फलक लावणेची कार्यवाही

करण्यासंदर्भात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी शिरोळ शहर व्यापारी असोसिएशन आणि सर्व दुकानदार व्यापारी व्यावसायिक उद्योजक यांना दिले आहे.

error: Content is protected !!