शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळची सुकन्या व महाराष्ट्र महिला केसरी पै. अमृता शशिकांत पुजारी हिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेकरीता महाराष्ट्र कुस्ती संघाच्या निवड चाचणीसाठी सहभाग घेणार असल्याने २५ डिसेंबर रोजी शिरोळ येथे होणारा
नागरी सत्कार स्थगित करण्यात असल्याची माहिती नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी पत्रकार बैठकीत दिली.पैलवान अमृता पुजारी ही दि
२८ ते ३० डिसेंबर दरम्यान १५ ते २० वर्षाखालील महिला ग्रेकोरोमन व फ्रि स्टाईल विभागातील कुस्ती स्पर्धा उत्तर प्रदेशामधील गोंडा येथे होणार आहेत.या स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्ती संघाची निवड चाचणी दि.२४ ते २५ डिसेंबर रोजी इंदापूर येथे होणार आहे.
या निवड चाचणीसाठी पै.अमृता पुजारी यामध्ये सहभागी होणार आहे.यामुळे सोमवारी २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणारा नागरी सत्कार हा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.तसेच पैलवान अमृता पुजारी व पालकमंत्री यांची वेळ निश्चित करून
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे रावसाहेब देसाई यांनी सांगितले.या पत्रकार बैठकीला
कुस्तीगीर परिषदेचे पैलवान प्रकाश गावडे योगेश पुजारी बबन पुजारी बजरंग वंटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.