निपाणी / प्रतिनिधी
निपाणीसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांसाठी तारणहार ठरलेल्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे.कारखान्याने १ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान, ८० हजार ३३८ मॅट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या उसाचे प्रतिटन ३००० रुपये प्रमाणे होणारे २४.१० कोटी रुपये ऊस बिल ऊस पुरवठा केलेल्या संबंधित ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत,अशी माहिती कारखान्याचे चेअरमन एम.पी.पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.सदर प्रसिद्ध पत्रकात,हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीचे शिल्पकार चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे. २७ ऑक्टोबर रोजी कारखान्याचा गळीतहंगाम सुरू झाला आहे.या वेळेपासून कारखान्याने गाळप केलेल्या उसाला प्रतिटन ३ हजार रुपये प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर अदा केली आहे.या पुढील काळात देखील ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नियमितपणे ऊस बिल अदा केले जाणार आहे.तरी परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक आपला ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.कारखान्याच्यावतीने सर्व वर्गाच्या सभासदांना प्रतिवर्षी साखर वितरित केली जाते.सध्या सभासद साखरेचे वितरण सुरू आहे.सभासद साखरेची मुदत्त ३० डिसेंबर रोजी ही संपणार आहे.तरी सर्व सभासदांनी ३० डिसेंबरच्या पूर्वी आपली सभासद साखर घेऊन जावी असे आवाहन,देखील चेअरन एम.पी.पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.