सांगली / प्रतिनिधी
ऊस दराचा तिढा सुटावा यासाठी सांगली जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.याबैठकीत स्वाभिमानीचे नेते मा.खा.राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे एफ आर पी अधिक शंभर रुपयाचे मागणी केली.मात्र जिल्ह्यातील कारखानदार ३१०० रुपये पहिली उचल देण्यावर ठाम आहेत.मात्र,दुष्काळ भागातील कारखानदारांनी आक्षेप घेतला.त्यामुळे शेट्टी यांनी कारखानदारांची मागणी अमान्य करत बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना अंतिम प्रस्ताव दिला या प्रस्तावांमध्ये गतवर्षीचा साखर उतारा साडेबारा टक्के पेक्षा अधिक असल्यास पहिली उचल ३२५० रुपये साडेबारा पेक्षा कमी असल्यास ३२०० आणि ज्या कारखान्यांचा साखर उतारा दहा टक्के आहे.त्या कारखान्यांनी ३ हजार १०० रुपये असा शेवटचा प्रस्ताव ठेवण्यात आला. कारखानदारांनी आमचा प्रस्ताव मान्य न केल्यास आम्ही आमच्या मार्गाने कुठेही आंदोलन करू,असा इशारा राजू शेट्टी यांनी बैठकीत दिला.मात्र दीड तास चर्चेनंतर ही तोडगा निघत नसल्याने राजू शेट्टी बैठकीतून बाहेर पडले.यावेळी साखर कारखानदारांनी २६ डिसेंबर पर्यत वेळ द्यावा अशी मागणी केली.या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली,विश्वास कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक,क्रांतीचे शरद लाड, वसंतदादाचे विशाल पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी,महेश खराडे,संदीप राजोबा, संजय बेले,बाबा सांद्रे, प्रवीण कोल्हे,सुभाष पाटील, धन्यकुमार पाटील, मनोहर पाटील, रोहित पाटील उपस्थित होते.