दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडी श्री स्वामी समर्थ गुरुपीठात सामुहिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा

दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात सामुहिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा

नृसिंहवाडी / प्रतिनिधी
आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी(दत्तधाम)येथे दत्तजंयतीनिमित्त दि.२० डिंसेबर ते २७ डिसेंबर अखेर सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताह,अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताह,
महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार दि.२० रोजी मंडल स्थापना, अग्निस्थापना,स्थापित देवता हवन,सामुहिक श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात.गुरुवार दि.२१ रोजी नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग,श्री मनोबोध याग,शुक्रवार दि.२२ रोजी नित्य स्वाहाकार,श्री गीताई याग,शनिवार दि.२३ रोजी नित्य स्वाहाकार,श्री स्वामी याग.रविवार दि.२४ रोजी नित्य स्वाहाकार,श्री चंडीयाग.सोमवार दि.२५ रोजी नित्य स्वाहाकार,श्री रुद्र याग,मंगळवार दि.२६ रोजी नित्य स्वाहाकार,बली पुर्णाहुती, दुपारी १२:३९ वा.श्री दत्त जन्मोत्सव होईल. बुधवार दि.२७ रोजी श्री सत्यदत्त पुजन,देवता विसर्जन,अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताह सांगता,सकाळी १०:३० वा.महाआरती होऊन महाप्रसाद होईल.दैंनदिन कार्यक्रमामध्ये सकाळी आठ वा.भुपाळी आरती, सव्वाआठ वा.नित्य स्वाहाकार,साडेआठ ते दहा वाजेपर्यंत सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन,साडेदहा वा.नैवेद्य आरती, १०:४५ वा.विशेष याग,दुपारी  दोन ते
साडेपाच वाजेपर्यंत श्री दूर्गा सप्तशती,श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन,सांयकाळी सहा वा.औंदुबर प्रदक्षिणा,साडेसहा वा.नैवेद्य आरती, सात वा.विविध विषयावर मार्गदर्शन, साडेसात वा.नित्यसेवा,नित्यध्यान
असे कार्यक्रम होतील.आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक सह , नृसिंहवाडी,पीठापूर,गाणगापूर तसेच परदेशातील सेवा केंद्रात एकाचवेळी दत्तजंयतीनिमित्त श्री गुरुचरित्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक,श्री स्वामीसेवक,भक्तानी लाभ घ्यावा.तसेच ज्या भाविकांना सप्ताहाकाळात अन्नदान सेवा करण्यासाठी धान्य, वस्तु,पदार्थ,देणगी द्यावयाची असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,(दत्तधाम) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Spread the love
error: Content is protected !!