पंधरवड्यापूर्वी कागल येथील श्री.खानु भागोजी रानगे या मेंढपाळाची बकऱ्याची १५ लहान पिल्ले तरस या प्राण्याने हल्ला करून खाल्ली होती.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा हस्ते वन विभागाच्यावतीने रानगे कुटूंबाला ३२ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली.तसेच आठवड्यापूर्वी नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.दरम्यान आठवड्यापूर्वी कोल्हापुरात झालेल्या जनता दरबारात या घटनेचा पंचनामा करून वन विभागाच्यावतीने शासकीय नियमानुसार आर्थिक मदत करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या.यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, कोल्हापूर विभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, करवीरचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, माजी नगराध्यक्ष नवल बोते, वन विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले आदी प्रमूख उपस्थित होते.