नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पर्यावरणाची हानी प्रदूषणात वाढ

नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पर्यावरणाची हानी प्रदूषणात वाढ
उघड्यावर पेटवला कचरा शिरोळकरांचे आरोग्य धोक्यात
शिरोळ / प्रतिनिधी चंद्रकांत भाट
नृसिंहवाडी गावच्या हद्दीत आणि शिरोळच्या सीमेलगत असणाऱ्या उघड्या कचरा डेपोतील कचरा ग्रामपंचायतीने पेटवून प्रदूषणात वाढ करण्याबरोबरच शिरोळकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा भोंगळ कारभार सुरू केला आहे.याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनता भोगत असताना ग्राम विकास अधिकारी भैरू टोने हे संपात सहभागी झाले आहेत.यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारा बाबत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली जात आहे.यामुळे येथील कसा डेपो तात्काळ हटवावा अशी मागणी होत आहे.शिरोळ नृसिंहवाडी मार्गावरील श्री हनुमान मंदिरासमोरील नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उघड्या जागेवर गेल्या काही दिवसापासून कचरा टाकला जात आहे.या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी सातत्याने पसरत आहे.कचऱ्यातील आलेल्या प्लॅस्टिक पिशव्या कागद हे वाऱ्याने शेजारील शेती पिकात पसरत आहेत यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तसेच पिकांचेही  आरोग्य धोक्यात आले आहे तसेच मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाल्यानंतर तो कचरा वर्गीकरण न करता प्लास्टिकबरोबरच कचरा पेटवला जातो यामुळे येथील हवा दूषित होत आहे.वास्तविक प्लास्टिक पेटवायचा नाही असे आदेश असताना सुद्धा ग्रामपंचायत प्लास्टिक पेटवून प्रदूषणात वाढ करीत आहे.या कचरा डेपो शेजारी काही नागरिकांची रहिवाशी वस्ती आहे.तसेच श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची दररोज रीघ लागलेली असते शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते कचरा पेटवल्यामुळे वाहन चालकांच्या डोळ्यात राख व धूर जाऊन त्यांच्या डोळ्यास इजा होत आहे.कचरा पेटवल्याने शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाचे धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच कचऱ्याच्या आगीमुळे परिसरात असणारी झाडे सुद्धा जळाली आहेत.यामुळे पर्यावरणाला आणि प्रदूषणाला हानिकारक असणारा येथील कचरा डेपो हलवावा अशी मागणी शिरोळकरांनी केली आहे.पण नुसिंहवाडी ग्रामपंचायतीने आपल्या गावातील सर्व कचरा शिरोळकरांच्या सीमेलगत आणून टाकून आपले गाव स्वच्छ ठेवून दुसऱ्याच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे.येत्या काही दिवसात या ठिकाणचा कचरा डेपो अन्यत्र हलवला नाही तर या परिसरातील शेतकरी रहिवाशी नागरिक नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत नृसिंहवाडीचे ग्रामसेवक भैरू टोने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी संपात असल्याचे उत्तर देऊन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले.
— चौकट —
जनतेचे आरोग्यास घातक असणारा कचरा डेपो त्वरित हलवावा : शरद देशमुख
शिरोळ ते नृसिंहवाडी मार्गावर श्री हनुमान मंदिर हे धार्मिक स्थळ आहे या मंदिरासमोरच नुसिंहवाडीचा कचरा डेपो आहे.या डेपोतील कचरा पेटवून या परिसरात राहणारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते पर्यावरण आणि प्रदूषणाची हानी होत आहे यासाठी तात्काळ हा कचरा डेपो हलवावा अन्यथा नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या विरोधात रहिवाशी आणि शेतकऱ्यांना एकत्र करून आंदोलन करू
 शरद माने देशमुख (शिरोळ)
Spread the love
error: Content is protected !!