सोनहिरा शेतकरी सहकारी साखर वजन काटा बंद करणार कारखान्याने चालू वर्षीच्या उसाला FRP ३२७४+१०० असे ३३७४/ रुपये गतवर्षी गाळात झालेल्या उसाचे ज्यांनी तीन हजार रुपयांच्या वरती बिल दिले आहे.त्यांनी पन्नास रुपये व ज्यांनी तीन हजार रुपयांच्या आत बिल दिले आहे.त्यांनी शंभर रुपये द्यावे यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यानंतर दत्त इंडिया कारखाना सांगली,दालमिया साखर कारखाना कोकरूड येथे यशस्वी ऊस दराची कोंडी फुटल्यानंतर पुन्हा एकदा राजू शेट्टी यांचे नेतृत्वाखाली सोनहिरा साखर कारखान्याचा वजन काटा बंद आंदोलन कोणत्याही क्षणी करण्यात येणार आहे.त्यासाठी गावोगावी जनजागृती सभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा,पलूस तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,कडेगाव तालुका अध्यक्ष बाळासो जाधव,जिल्हा उपाध्यक्ष राजू माने,कडेगाव तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष आनंद जंगम,पलूस तालुका युवागाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, बाबुराव शिंदे,अजमुदीन मुजावर, इम्रान पटेल यांनी आज शिवनी,अमरापूर,कडेपूर, बेलवडे,सासपडे, विहापूर,नेरली,कडेगाव या ठिकाणी जनजागृती बैठका घेण्यात आल्या.