आंबोलीत परमपूज्य सद्गुगुरू संत महंत भारतदास   महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम

शिरोळ /  प्रतिनिधी
आंबोली ( ता सावंतवाडी) येथील परमपूज्य सद्गुगुरू संत महंत भारतदास महाराज (बाबा) यांची 23 वी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या 21 व 22 डिसेंबर रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.पुण्यतिथी निमित्त 21 तारखे रोजी नामवंत व्यक्तींचे रात्री भजन,कीर्तन,प्रवचन यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या 22 डिसेंबर रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते स्वयंभू गणेश मूर्ती अभिषेक तसेच भारतदास महाराज यांच्या समाधी स्थळावरील मूर्तीस अभिषेक आरती झाल्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे वाटप
करण्यात येणार आहे.परमपूज्य सद्गुगुरू संत महंत भारतदास महाराज चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक गावडे,उपाध्यक्ष मंगेश नाटलेकर,सचिव दिलीप गावडे,संचालक शंकरराव पार्सेकर,बाळासाहेब माळी,नारायण तवटे,रमेश गावडे,सौ गिरीजा पासे़ँकर
यांच्यासह सर्व संचालक भाविक भक्त परिश्रम घेत आहेत.राम मंदिर राघवेश्वर मंदिर स्वयंभू गणेश मंदिर समाधी मंदिर परिसरात रंगरंगोटी बरोबर विद्युत रोषणाई करण्याचे काम युद्धपात्र सुरू आहे.परम पूज्य सद्गुगुरु संत
महंत भारतदास महाराज यांचे भक्तगण कोल्हापूर, सांगली,सातारा,बेळगाव,गोवा,सिंधुदुर्ग, पुणे ,मुंबई यासह अन्य परिसर मोठ्या संख्येने आहेत परमपूज्य सद्गुगुरू
संत महंत भारतदास  महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
Spread the love
error: Content is protected !!